विसरवाडी प्रतिनिधी/समीर पठाण: नवापूर तालुक्यातील ढोंग शिवरातील शेतकरी विश्वास गावीत यांच्या मक्याच्या शेतात कापनी करीत असताना बिबट वन्य प्राण्याचे पिलू आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर वनविभागाच्या प्रयत्नाने शेतातून ते पिलू मादी बिबट्या घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट केले. याबाबत वनविभागास कळविताच सी एफ मनीनू सोमराज धुळे वणवृत, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली चिंचपाडा वनक्षेत्रातील वनपाल युवराज भाबड, सुजित बेडसे, वनरक्षक रामदास गावीत, तुषार नांद्रे,अमोल गावीत, दिनेश कोकणी, देवमन सूर्यवंशी यांनी संबंधित जागेवर जाऊन सदर पिलास पशु वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल पाटील, व डॉ अविनाश वळवी यांच्या कडून तपासणी करून जागेवरच उन्हामुळे डिहायड्रेशन होऊ नये करिता औषधोपचार करून पिलास सावलीत ठेवून वन्यजीव वार्डन सागर निकुंभे, महेश तायडे, रहीम बेलदार, अजय नाईक, हेमंत पवार कौशल फळे यांनी मकईच्या शेतात कॅमेरे लावण्यात आले. या पिल्लास त्याच ठिकाणी मकईच्या शेतात कॅरेटमध्ये ठेवण्यात आले. आईशी पिल्लांची ताटातूट झाल्याने पिल्लांच्या ओढीने मादी बिबट्या जास्त रागीट होऊ नये, म्हणून बिबट पिल्लू सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत मादी बिबट्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले होते. सदरील स्थळी संध्याकाळी उशिराने बिबट मादी जागेवर येऊन पिलास सुरक्षित घेऊन गेली. असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विडियो प्रसारित केला आहे.
0 Comments