नंदुरबार/ प्रतिनिधी:नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसतर्फे अॅड. गोवाल पाडवी यांनी मुहूर्त साधत आज 22 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल केली 25 एप्रिलला शक्तिप्रदर्शन करीत पुन्हा उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याचे नेत्यांनी सांगितले.नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे अॅड. गोवाल पाडवी हे दिनांक २३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते.मात्र त्याच दिवशी भगवान हनुमान जयंती असल्याने ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असतात, तसेच सप्तशृंगी माता यात्रा त्याच दिवशी असल्याने तिथे दर्शनासाठी भाविकांना जावयाचे असल्याने तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी ईच्छा सर्व कार्यकर्त्यांची होती, म्हणून २३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल न करता २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायचे ठरवले होते. असे असताना आज नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसतर्फे अॅड. गोवाल पाडवी यांनी मुहूर्त साधत आज 22 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी, अभिजीत पाटील, नितीन जगताप आदी, पंडित तडवी आदी निवडक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली.दरम्यान २५ एप्रिल रोजी अजून उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून त्याच दिवशी शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे यावेळी अभिजीत पाटील यांनी सांगितले. नंदुरबार येथील संजय टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी 10 वा. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीत कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments