Header Ads Widget


साक्रीच्या सि.गो.पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी देवश्री बागुल ऑनलाईन प्रश्नमंजुषेत प्रथम.

 


          प्रथम - देवश्री नरेंद्र बागुल

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विद्या विकास मंडळाचे सी.गो.पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री तर्फे विद्यापीठ स्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न सदर प्रश्नमंजुषेतून करण्यात आला. त्यांनी केलेला चवदार तळ्याचा सत्याग्रह फक्त पाणी पिण्यासाठी नसून तो नैसर्गिक अधिकार प्राप्तीचा एक प्रयत्न होता अशा स्वरूपाच्या प्रश्नांना सदर प्रश्नमंजुशेत स्थान देण्यात आले होते.त्याचबरोबर आरबीआयच्या स्थापनेत डॉ बाबासाहेबांच्या पुस्तकाचे महत्व,त्यांनी केलेला शेती संदर्भातला लढा, नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतीच्या काळात मिळणाऱ्या सवलती सारख्या प्रश्नांचा अंतर्भाव सदर प्रश्नमंजुषेत केलेला होता.


             द्वितीय - सारंग कैलास पाटील

 सदर प्रश्नमंजुषेला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


          तृतीय -जयकुमार मुरलीधर वानखेडे

सदर प्रश्नमंजुषेत प्रथम देवश्री नरेंद्र बागुल सी गो.पाटील महाविद्यालय साक्री,द्वितीय सारंग कैलास पाटील, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य, महाविद्यालय अमळनेर, तृतीय जयकुमार मुरलीधर वानखेडे, प्रताप महाविद्यालय अमळनेर तर उत्तेजनार्थ बक्षीस सि गो पाटील महाविद्यालय साक्री च्या मयुरी विलास सोनवणे हिने पटकाविले. प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांनी वडील कै. रामदास बापू अहिरे यांच्या स्मृतीपित्यर्थ बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना अनुक्रमे 500,300,200 व 100 रु रोख व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे.


                उत्तेजनार्थ -मयुरी विलास सोनवणे

 यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सदर प्रश्नमंजुषा घेण्यात आली असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी अभिवादन सभे प्रसंगी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.डी.पी.पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. डी.एस.चव्हाण तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर बांधव प्रसंगी उपस्थित होते. अभिवादन सभेचे संचालन डॉ.चंद्रकांत कढरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.डी.एस चव्हाण यांनी केले. विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील, अध्यक्षा मंगलाताई सुरेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ.डी एल.तोरवणे यांनी सदर उपक्रमास शुभेच्छा देऊन बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

|