प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे : शहादा शहरात डासांच्या प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.शहरातील प्रत्येक गल्ली बाेळात कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे.डासांमुळे हिवतापांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे डासांचे निर्मूलन करण्यासाठी त्वरित फवारणी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने सुरू होती.त्याची दखल म्हणून नगरपालिका प्रशासनाने शहादा शहरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने औषधी फवारणी सुरू केली आहे.सायंकाळ पासून डासांची परिस्थिती बिकट असते.सर्वत्र डासांच्या प्रादुर्भाव असल्याने घरात बसणे देखील कठीण होते.विद्युत पंखे तसेच मच्छर अगरबत्ती लावून देखील उपयोग होत नाही.रात्रभर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.पूर्ण शहादा शहरात परिस्थिती सारखीच आहे.औषध फवारणी ही प्रभावीपणे केली गेली पाहिजे.फवारणी करण्याचे औषध देखील प्रभावी असले पाहिजे तरच काहीशा प्रमाणात डासांचे निर्मूलन होईल अन्यथा जैसे थे परिस्थिती राहील.नगरपालिका प्रशासनाने किमान महिन्यातून दोन वेळा तरी फवारणी करणे आवश्यक आहे.संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक प्रभागात फवारणी झाली की नाही याची प्रत्यक्ष माहिती घेणे गरजेचे आहे.अन्यथा काही भागात फवारणी केली जाते तर काही भागात कधीच फवारणी होत नाही.त्याच्याच परिणाम डासांचे प्राबल्य वाढण्यास मदत होईल . शहादा शहरात सर्वत्र ठीक ठिकाणी नगरपालिकेच्या मोकळ्या जागा रिकामे प्लॉट तसेच रस्त्यांवर सांडपाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले आहेत.गटारी तुंबलेले आहेत.शहरातून दोन ते तीन पाण्याचे पाट गेले आहेत त्यांच्यात देखील गटारीचे व नागरिकांनी आपापल्या घरांचे सांडपाणी सोडल्याने केरकचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.नगरपालिका प्रशासनाने याबाबत दखल घेऊन रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत सांडपाणी सोडल्यास कारवाई करणे गरजेचे आहे.नवीन वसाहतींमध्ये सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली आहेत ते देखील मुख्य कारण आहे.म्हणून काटेरी झुडपे देखील तोडण्यात यावी अशी मागणी आहे.डासांच्या प्रादुर्भाव वाढल्याने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्या कमालीच्या रोष आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड.सरजू चव्हाण यांनी नगरपालिका प्रशासनाकडे डासांचे प्रमाण वाढल्याची वेळोवेळी तक्रार देखील केली.नगरपालिका प्रशासनाला देखील त्यांनी लक्षात आणून दिले.मोकळ्या जागा तसेच रिकाम्या प्लॉटमधील जागांमध्ये सांडपाणी सोडण्यात येते ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.काटेरी झुडपे तोडण्याची मागणी देखील त्यांनी केली होती.त्याची दखल म्हणून नगरपालिका प्रशासनाने शहरात औषधी फवारणी सुरू केली आहे.
डासांच्या वाढता प्रादुर्भाव बघता नगरपालिका स्वच्छता विभागातर्फे दोन ट्रॅक्टर लावून औषधी फवारणी युद्धपातळीवर सुरू केली आहे.प्रत्येक प्रभागात तसेच वसाहतींमध्ये फवारणी केली जाईल.नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.साचलेले पाण्याचे डबके गटारी शहरातून गेलेले पाण्याचे पाट यांच्यात देखील फवारणी केली जात आहे.काटेरी झुडपांमध्ये फवारणी केली जात आहे.सांड पाण्याबाबत तसेच काटेरी झुडपे तोडण्याबाबत फवारणीनंतर कार्यवाही केली जाईल-गोटू तावडे-स्वच्छता निरीक्षक-शहादा नगरपालिका.
0 Comments