Header Ads Widget


भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी....

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रा.गणेश सोनवणे: शहादा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.हजारो भीमसैनिकांसह विविध संघटना संस्थांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शहादा शहरातील प्रांत अधिकारी कार्यालय जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दिवसभर अभिवादनासाठी कार्यकर्ते येतच होते. सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सामूहिक बुद्ध वंदना म्हणण्यात आली.यावेळी प्रांत अधिकारी सुभाष दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत मुख्याधिकारी दिनेश सिनारे सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया जिल्हा शिवसेना प्रमुख अरुण चौधरी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश्वर सामुद्रे रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर अनिल कुवर सुरेंद्र कुवर शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड ज्येष्ठ कार्यकर्ते यादव कुवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते अजय शर्मा खरेदी विक्री संघाचे चेअरमन मकरंद पाटील जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे भोई समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते सुपडू खेडकर ,सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा संजय जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विद्युत रोषणाई व फुलमाळांनी सुशोभित करण्यात आलेला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे व संजय निकुंभ यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्याजवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आलेले होते.शहादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ज्येष्ठ नेते अजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.तर शहरातून महिलांनी व तरुणींनी मोटर सायकल रॅली काढली होती तर अनेक तरुणींनी नृत्य देखील सादर केले.संभाजीनगर येथील बोधी वृक्ष परिसरात देखील जयंती साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

|