प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे: शहादा येथील शहादा नगरपरिषद संचलित पुज्य सानेगुरुजी वाचनालयात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आर पि आय जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अरविंदअण्णा कुवर यांनी पुष्प माला अर्पण केली. याप्रसंगी राष्र्टसेवा दल जिल्हाध्यक्ष प्रा.आर.टी.पाटीलसर, समित्र क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, सचिव प्रा.संपत कोठारी, जेष्ट कवी अरुण राठोड,बालकवी रमेश महाले व ग्रंथपाल गांगुर्डे चेतन, सहा.कांतिलाल चौधरी यांनी प्रतिमेस फुलपुष्प अर्पण केले.
यावेळी प्रा.आर.टी.पाटीलसर यांनी जिवन कार्याची माहिती दिली. महामानवास यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम अशी व्यक्ती क्वचितच जन्माला येते. अत्यंत हालाखीच्या परिस्तथीतून ऊच्चतम शिखरावर पोहोचते पण ऊच्चतम शिखरावर पोहचल्यावर सुध्दा तळागाळतील जनतेला समाज बांधवांना विसरत नाही ऊलट त्यांना दलदलीतून वर काढते त्यांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना ऊतुंग भरारी मारण्याचे प्रोत्साहन देते सोबतच त्यांच्यात व ईतर समाजात प्रखर देशभक्ती निर्माण करण्याचे प्रयत्न करते सर्व समाजा प्रति, गरीब श्रीमंत ह्या मधे भेदभाव न करता आपली निष्ठा त्यांच्या प्रति दर्शविते. ऊच्च शिक्षणात विश्वविख्यात विद्यापीठांच्या अनेक पदव्या, डॅाक्टरेट सारख्या पदव्यांनी सुशोभित होत असतांना त्यांचा तीळईतकाही अंहपणा न बाळगता त्यांचा फायदा फक्त आणि फक्त देशा साठी कसा होईल ह्याचाच फक्त विचार त्यांनी केला. स्वातंत्र्योत्तर भारताला कशा प्रकारचे संविधानाची गरज आहे ह्याचा सर्वतोपरी अभ्यास करून सर्वांचे विचार समजून घेऊन अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून एक ऊत्तम निर्मिती म्हणजे “भारताचे संविधान“ सर्व ग्रंथात श्रेष्ठ सर्व संविधानात श्रेष्ठ अशा संविधानाची निर्मीती त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यात त्यांचाच सर्वात मोठा असा सिंहाचा वाटा आहे. आज विचार केला तर त्याची प्रचती आल्याशिवाय राहत नाही. आज देशातील लोकतंत्र टीकविण्यास ह्याच संविधानाचीच फारमोठी व मोलाची मदत होत आहे. देशाचे लोकतंत्र कधीही कोणही अडचणीत आणन्याचा बदलण्याचा कोणताही प्रयत्न केला तरी तो कोणीही करू शकणार नाही येवढा हा लोकशाहीचा ग्रंथ मजबुत आहे.प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी माहिती देत बाबासाहेबांचे उपकार निव्वळ दलित मागसलेल्या समाजावरच नसून त्यांनी प्रत्येक व्यक्तींचा प्रत्येक घटकांचा विचार केला आहे असे संविधातून प्रतिबींबीत झाल्या शिवाय राहत नाही. अशा ह्या महामानवास शत शत नमन: कवी राठोड यांनी कविता सादर करत या विषयी पुढे सांगत संविधानामुळे देशाला बळकटी आली याचा लाभ सपुर्ण राष्र्टाला होतो आहे.बालकवी रमेश महाले यांनी बाबासाहेब यांच्या वर लेखणी स्वरुपात कविता सादर करत अभिवादन केले.यावेळी माजी नगरसेवक अरविंदअण्णा यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षे बरोबर बाबासाहेब यांचे जिवन चरित्राचाही अभ्यास करावा व मोठ्या उच्च पदावर आपले वर्णी लावावी व आपल्या वाचनालयाचे व शहराचे नाव उंचवावे.ग्रंथपाल चेतन गांगुर्डे यांनी बाबासाहेबांच्या जिवनातील एक आठवण उपस्थितांन समोर मांडत स्पर्धेत व जिवनात याचा उपयोग करुण घ्यावा असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी अरविंदअण्णा कुवर, प्रा.आर टी पाटील, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, अरुण राठोड, रमेश महाले, ग्रंथपाल गांगुर्डे चेतन, सहा.कांतीलाल चौधरी, वाचनालयाचे नियमित वाचक आकाश अहिरे, करण निकूम, रोहित जाधव, भाविका ठाकूर, मितेश जैन, खुशी देसाई, अविनाश मोरै, अवनी भिंगाणे, प्रद्मा चौधरी, राकेश पवार, भावना जाधव, पाडवी गणेश, संजना पवार, पवार करिना, गौरी पवार, मयुर पाटील, गायत्री सोनवणे, क्रिश जैन,गवळे, सोहम लोढा, दिशा पाटील आदी अभ्यासू वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होते.
0 Comments