नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे
शहादा येथील भक्ती परिवारातर्फे शहादा तालुक्यातील तीन गौ शाळांना चारा उपलब्ध करून दिल्याने भक्ती परिवाराचे कौतुक केले जात आहे.शहादा शहर सह परिसरातून अनेक गायी गौ शाळा देण्यात आलेले आहेत.काहींनी मोकाट सोडून दिलेल्या होत्या त्या गौरक्षक सदस्यांनी गौशाळांना दिल्या आहेत.शहादा तालुक्यातील गौ शाळांना चांगल्या प्रकारे निगा केली जात आहे.अनेक सेवाभावी संस्था गौ शाळांमध्ये गायींसाठी चारा उपलब्ध करून देत असतात.त्यात सातत्याने इन्कलाब फाउंडेशन तर्फे भाजी मार्केट मधून वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला खरेदी करून गायींना टाकतात. नुकताच मध्य प्रदेशातील भागवतकार आचार्य अनिल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा येथील भक्ती परिवारात तालुक्यातील असलोद येथील २० वरूळ- कानडी येथे ३० व शहादा-शिरपूर रस्त्यावर भागवतकार खगेंद्र महाराज यांच्या गौ शाळेला ५० गायींना गहू हरभरा व मका या पिकांच्या चारा तीन गाड्या उपलब्ध करून दिल्या.शहादा येथे अन्नपूर्णा लॉन्स येथे भागवताचार्य अनिल शर्मा यांचे शिवपुराण पतीच्या कार्यक्रम झाला होता.त्यात येणाऱ्या सेवेकरींना गौ शाळेला चारा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याचे आव्हान केले होते त्यात जवळजवळ २९ हजार रुपये पर्यंत मदत गोळा झालेली होती त्याच्यातून हात चारा घेण्यात आला. भक्ती परिवारातील प्रा.नंदलाल निझरे जिजाबराव पाटील कैलास पाटील व सहकार्यांनी चारा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान दिले.
0 Comments