नंदुरबार/प्रतिनिधी:नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात पाणी समस्या निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली दि. 19 एप्रिल 2024 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. ज्या गावांना पाणीटंचाईच्या तीव्र समस्या आहे. अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांना जलद गतीने पूर्ण करणे बाबत सूचनाही देण्यात आल्या असून, जे काम अंतिम स्तरावर आहेत. अशा कामांना तात्काळ पूर्ण करून पाणीटंचाई निवारण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. जलजीवन मिशन या योजनेमुळे प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे जलजीवन मिशन या योजनेला गती देण्यात येणार आहे. त्यासोबत यावर्षी पाण्याच्या तीव्र समस्या जाणवत असल्याने पुढील काळात पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्या उद्भवणार नाही यासाठी जिल्हा परिषद अहोरात्र मेहनत करत असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईसाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित, अजय पाटील कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, तसेच सर्व तालुक्यातील उप अभियंता उपस्थित होते. पाणीटंचाईने जिल्हाभरात नागरिकांपुढे मोठी समस्या उद्भवलेली आहे , जल जीवन मिशन अंतर्गत किती ठिकाणी या योजनेचे पाणी गावांना प्यायला भेटत आहे त्यांची चौकशी करून सुरू न असलेले काम पूर्ण करून गावांना पाणी द्यावे, अशा अनेक प्रश्नांवर तोडगा म्हणून काय उपाययोजना होतील, समस्येचे निराकरण होईल का , म्हणून सर्व जिल्हावासियांच लक्ष लागून आहे.
0 Comments