औरंगबाद प्रतिनिधि : औरबगबादच्या छावनी परिसरात अग्नी तांडव पाहायला मिळाला. येथे एका टेलरच्या दुकानाला आग लागली एलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग वर होती या मुळे हे भीषण आग लागली ऐसे परिसरातील बोलले जात आहे. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला आहे छावनी परिसरातील दाना बाजार गल्लीतिल महावीर जैन मंदिराच्या बाजुची हे घटना आहे.
मध्यरात्री ४ वाजण्याच्या सुमारास या दुकानाला आग लागल्याची माहिती आहे. या अग्नितांडवात २ पुरुष ३ महिला आणि २ मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. आगीत संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जेव्हा ही आग लागली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य हे गाढ झोपेत असल्याची माहिती आहे. झोपेत असतानाच अचानक आग लागली आणि हे संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. मृतदेहांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
ज्या इमारतीला आग लागली ती तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खालच्या मजल्यावर टेलरचं दुकान होत. या दुकानात आग लागली आणि आग लागल्यानंतर पहिल्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचा गुदमरल्याने मृत्यू झाला आहे.
0 Comments