साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयातील बारीपाडा येथे वनव्यवस्थापन समिती अंतर्गत जंगलातील 415 महू फुलांच्या वृक्षांचा लिलाव करण्यात आला.गावातील 50 ते 60 नागरिकांसह वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पवार,सचिव चंदू चौधरी व मोतीराम पवार,बंडू बागूल, सोमनाथ चौरे,वसंत भोये,कैलास पवार,बाबूराव पवार,भुन्या पवार,दयाराम पवार,जगन चौरे,किसन भोये,श्रावण पवार,खतू चौरे, शिवा पवार,सोमन चौरे,चैत्राम पवार आदी उपस्थित होते.या वेळी गावातील महीलासह ग्रामस्थ जंगलात लिलावाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एक हजार 100 हेक्टर जंगलात असलेल्या महू वृक्षांच्या फुलांचा लिलाव प्रत्येक महूच्या झाडाजवळ जाऊन त्याची किंमत त्याला आलेल्या बहारावर,आकारावर,तसेच या वृक्षापासून उत्पादन(फुले)किती मिळतील त्यावर अवलंबून असते.प्रत्येक महू झाडांची बोली वेगवेगळी असते त्या लिलावाची सुरुवात 50 रुपयांपासून सुरू होते.आज 50ते 1600 रुपयांपर्यंत लिलाव झाला.सगळ्यात महाग महू वृक्ष दोन हजार रुपयांना गेला.अशा प्रकारे ग्रामस्थांनी गेल्या 32 वर्षापासून महू झाडांची लिलाव पद्धत ही परंपरा जंगल क्षेत्रात सुरू ठेवली आहे.त्यात नियम व अटी-शर्ती देखील आहेत.या सगळ्या लिलाव करणा-याची लिलाव संपल्यानंतर वनभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.उरलेली रक्कम वनव्यवस्थापन समितीत ठेवली जाते.आज 13 हजार 300 रुपयांचा जंगल परिसरातील महू फुलांच्या 415 वृक्षांचा लिलाव करण्यात आला.वनउपज खरेदी करण्यासाठी वनधन केंद्र असून जंगलातील वन उपज बारीपाडा,मोहगाव, चावडीपाडा या ठिकाणी खरेदी व विक्री केली जाते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments