नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डॉ.उत्तम वेडू निळे यांना वर्ल्ड ह्युमॅनिटी कमिशनच्या वतीने राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.उत्तम निळे यांना धरणगाव येथे क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात वर्ल्ड ह्युमॅनिटी कमिशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.डॉ.उत्तम निळे यांचे संशधनात्मक कार्य आणि शैक्षणिक योगदान याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रा.डॉ. निळे यांचे आतापर्यंत भूगोल विषयावर 20 पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये 102 रिसर्च पेपर प्रकाशित झालेले आहेत. तर 30 रिसर्च पेपरचे विविध परिषदांमध्ये सादरी करण केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पीएचडी अवॉर्ड झाले आहेत.त्यांनी पर्यावरण संवर्धन, जागतिक तापानवाढ, ओझोन क्षय इत्यादी विषयांवर 150 पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.तसेच विविध विद्यापीठात पीएचडी रेफरी म्हणून काम केले आहे. त्यांच्या या रचनात्मक शैक्षणिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला आहे.पुरस्कार प्राप्त झाल्यबद्दल त्यांचे मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.पटेल, उपप्राचार्य डॉ.एस.डी.सिंदखेडकर, सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments