Header Ads Widget


भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह दिनांक १८ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत आयोजन...


 प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे :शहादा येथे काशीमाॅ नगर मधील गजानन महाराज मंदिराच्या आवारात दिनांक १८ एप्रिल पासून भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह ला सुरुवात करण्यात आली असून प्रख्यात भागवताचार्य खगेंद्र महाराज यांनी कथेला सुरुवात केली आहे. भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह दिनांक १८ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी आठ वाजता प्रेस मारुती मंदिरापासून भागवत कथा ग्रंथाची कलश यात्रा काढण्यात आली. कलश यात्रेत खगेंद्र महाराज सहभागी झालेले होते.असंख्य महिलांनी डोक्यावर कलश घेतलेले होते. कलश यात्रा गजानन महाराज मंदिरापर्यंत नेण्यात आली. भागवताचार्य खगेंद्र महाराज यांनी धार्मिक पूजा विधी करून भागवत कथेसाठी यजमान यांच्याकडून संकल्प करवून घेतला व संकल्प सोडण्यात आला. संकल्प पूजा करतांना खगेद्र महाराज यांनी प्रत्येकाने जीवनात चांगला संकल्प केला पाहिजे. भागवत कथेचे आयोजन केले पाहिजे. भागवत कथा ऐकल्याने जीवन सार्थक होते. कर्म चांगले केल्याने चांगले फळ मिळते असे सांगून दुपारी तीन वाजेपासून भागवत कथेला प्रारंभ झाला. यावेळी भागवत कथा ऐकण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात महिला वर्गांची संख्या अधिक होती.२२ एप्रिल रोजी कृष्ण जन्मोत्सव होईल. २५ एप्रिल रोजी भागवत कथेच्या समारोप होईल. सकाळी ११ वाजता महाआरती होऊन महाप्रसाद वाटप होईल. भागवत कथेचे आयोजन माहेश्वरी जेष्ठ महिला मंडळ, माहेश्वरी समाज मंडळा मार्फत करण्यात आले असून भाविकांनी दररोज दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत कथेच्या लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments

|