Header Ads Widget


साक्रीत भारतीय जैन संघटना आणि तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा..

 


साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा 


धुळे जिल्ह्यातील साक्री साक्री शहरातील जैन स्थानक ,पोळा चौक येथे महिला दिन आणि महिला सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात होता या कार्यक्रमाचे उदघाट्न साक्री येथील न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय श्री कैलासजी अढायके सर हस्ते करुन भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 जळगाव येथील भारतीय जैन संघटनेचे खान्देशाध्यक्ष श्री अशोकजी श्रीश्रीमाळ,, धुळे येथीलBJS राज्य कार्यकारणी सदस्य श्री विजयजी दुगड, श्री कांतीलाल कुचेरिया

 श्री हरकचंदजी बोरा ,BJS कोशाध्यक्ष श्री अजितजी टाटिया, तेरापंथ सभा अध्यक्ष श्री अनिलजी कांकरिया, स्थानकवासी संघ अध्यक्ष श्री राजेंद्रजी संचेती, कसारा सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेशजी पारख,, पिंपळनेर येथील रिखबचंद गोगड, भारतीय जैन संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ.जोशीलाताई पगारिया, स्थानकवासी महिला अध्यक्ष कविताताई टाटिया,तेरापंथ महिला मंडळाचे अध्यक्ष सौ. सुरेखाताई कर्नावट, युवक परिषद अध्यक्ष निखिल टाटिया आणि पियुष कर्नावट

 या सर्वांनी भगवान महावीरांचे पूजन केले

 न्यायाधीश आदरणीय श्री कैलास जी अढायके सर यांनी आपल्या भाषणात संत मुक्ताईमाता आणि संत महात्मा यांना वंदन करून महिलांना छान मार्गदर्शन केले सासू,सुनेचे ऋणानुबंध प्रेमाचे असावे छान जनजागृती केली

सर्व महिलांनी साहेबांचे आभार मानले

BJS चे खान्देश अध्यक्ष श्री अशोकजी श्रीश्रीमाल यांनी आपल्या भाषणात जैन समाजाच्या महिलांनी पुढे यावे आणि समाजासाठी कार्य करावे सौ जोशीलाताई पगारिया या खान्देश च्या जैन समाजाच्या एकमेव महिला आहे त्यांनी 78 पुरस्कार प्राप्त करून जैन समाजाचे नाव रोशन केले आहे

विजयजी दुगड,हरकचंदजी बोरा,सुरेशजी पारख यांनी आपल्या भाषणात महिलांनी पुढे यावे समाजात चांगले कामे करावे सौ जोशीला ताई पगारिया यांनी महिला दिनानिमित्त छान आयोजन केले आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल खूप कौतुक केले 

या महिला दिनाच्या कार्यक्रमात भारतीय जैन संघटना आणि तेरापंथ महिला मंडळातर्फे सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,पत्रकारिता मध्ये आपले कर्तृत्व दाखवणाऱ्या कर्तृत्वान महिलांचे सन्मान करण्यात आले 12 महिलांचा सन्मान फ्रेम शाल देऊन करण्यात आले 

 साक्री येथील मा.न्यायाधीश श्री कैलास जी अढायके सर आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले 

 महिलांनी टाळ्यांच्या गडगडाटाने सर्व सन्मानार्थिक महिलांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या

 महिलांचे सन्मान नावे 

 1)साक्री नगराध्यक्ष सौ जयश्रीताई हेमंतकुमार पवार 

2) नगरसेविका सौ जयश्रीताई विनोद कुमार पगारिया

 3) पत्रकार,भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्षा सौ जोशीला ताई अमरचंद पगारिया

4) सौ ज्योतीजी विनोदकुमार कांकरिया विरमाता 

, 5) तेरापंथ महिला अध्यक्ष सौ सुरेखाताई संतोष कुमार कर्नावट 

 6 )सो मंगलाताई सुरेशजी पारख 

 7) सौ कविता ताई विनोद कुमार टाटिया

8) सौ गायत्री ताई सचिन कुमारजी सोनवणे (पत्रकार )

 9 ) सौ टीना मनीष कुमार पगारिया 

 10 )सौ सोनम विजयकुमार जी टाटिया 

 11) सौ डॉक्टर अभिष्या अक्षय कुमार जी सिंगवी

 12)डॉक्टर खुशी निलेश कुमार जी कर्नावट

आभार भारतीय जैन संघटना जिल्हा कोषाध्यक्ष श्री अजितजी स्वरूपचंदजी टाटीया यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|