Header Ads Widget


कलाम युवा मंच चे डॉ. तुळशीराम गावित यांच्या निरोगी स्वास्थ्यसाठी व आमदार मंजुळाताई गावित पुनश्च आमदार व्हावेत यासाठी पीरबाबांना साकडे....

 




साक्री प्रतिनिधी/अकिल शहा

 हजरत पीर सातों सैय्यद बाबा दर्गा ही माळमाथा परिसरातील एक जागती जोत असणारी भामेर शिवारातील दर्गा मानली जाते.ही दर्गा सर्व जाती धर्मातील लोकांचे श्रध्दा स्थान असून ठिकाणी भाविकांचे नवस पूर्ण होतात, याच परिसरात जागती जोत म्हसाई माते चे मंदिर देखील आहे दर्गा ची शोभा वाढावी यासाठी कलाम युवा मंच सतत प्रयत्नशील असते. त्याच दर्गा साठी म्हसाई माता मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत भाई शाह यांनी देखील १० गुंडे जागा दिली.तसेच निजामपुर येथील कलाम युवा मंच बहुउद्देशीय संस्था ही अनेक समाजिक उपक्रम करण्यासाठी गावात ओळखली जाते,त्याचं प्रमाणे त्यांनी या सातो सय्यद दरग्याचे सुशोभीकरणाचे काम देखील हाथी घेतले आहे, दर्गा च्या सुशोभीकरणासाठी देणगी जमा करून कामाला सुरवात देखील केली आहे. कलाम युवा मंच चे अध्यक्ष फजल सय्यद यांचे डॉ.तुळशीराम गावित यांच्या वरती पहिल्या पासून प्रेम असून डॉ गावीत यांनी एक मोठ्या आजाराला मात दिली त्यासाठी त्यांचे स्वास्थ्य मध्ये अधिक चांगल्या प्रकारे सुधारणा व्हावी व त्यांची धर्मपत्नी साक्री तालुक्याचे कर्तव्यदक्ष विकासरत्न आमदार ताईसो मंजूळाताई गावित यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूक मधे पुन्हा एकदा भरघोस मतानी निवडून पुन्हा एकदा आमदार व्हावे व तालुक्यात असेच विकासनिधी,विकास कामे यावित यासाठी कलाम युवा मंच तर्फे दि.८ रोजी शुक्रवारच्या पवित्र दिवशी नमाज पठन करून कलाम युवा मंच चे अध्यक्ष फजल सय्यद व सर्व सदस्य यांनी हजरत पीर सातो सय्यद दर्गा वरती जाऊन मना पासून दुवा करत चादर चढ़वली व मानता घेतली कि आमची मानता पूर्ण झाल्यावर डॉ. तुळशीराम गावित व ताई सो मंजुळा ताई गावीत यांच्या सह मोठ्या भाविकासंह पुन्हा दर्गा ला येऊन या दोघांच्या हस्ते चादर चढवू व नारळ फोडून मोठा प्रसाद वाटप करू अशी मानता कलाम युवा मंच बहुउदेशीय संस्थे चे अध्यक्ष फजल सय्यद व सर्व सदस्य यांनी घेतली. यावेळी अध्यक्ष फजल सय्यद,आशिक शेख,युसूफ पठाण,वसिम शेख,युनूस पठाण,अमजद पठाण,इसाक मिर्झा,मतीन पठाण,भिकन मिर्झा,राजा पठाण, अझहर शेख,अबरार सय्यद,अकबर कुरेशी आदी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments

|