Header Ads Widget


साक्रीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) तर्फे युवा मिशन कार्यक्रम संपन्न...

 




साक्री प्रतिनिधी/अकिल शहा


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष प्रफुलजी पटेल व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे , राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर युवा मिशन २०२४ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष प्रफुलजी पटेल व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या आदेशावरून धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील शासकीय विश्रामगृहात युवा मिशन 2024कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव व धुळे जिल्हा निरीक्षक श्री ऋषिकेश दादा पिंगळे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष सुरेश आण्णा सोनवणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्हा अध्यक्ष सुमित दादा पवार व धुळे जिल्हा कार्याध्यक्ष आशिष शेठ अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा मिशन कार्यक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाला साक्री तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री पवन सुभाष संधानशिव यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला.

Post a Comment

0 Comments

|