Header Ads Widget


सी.गो.पाटील महाविद्यालय, साक्री येथे जागतिक महिला दिन साजरा...




साक्री प्रतिनिधी/अकिल शहा


विद्या विकास मंडळाचे, सीताराम गोविंद पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे महिला दिन साजरा करण्यात आला. नॅचुरल केअर सेंटर, सांगलीचे डॉ. रवींद्र वाकळे हे प्रमुख अतिथी होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. बी. पाटील होते. डॉ.वाकळे यांनी महिला दिनाचा पूर्व इतिहास सांगून महिला दिनाचे महत्व विषद केले. तसेच महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणने , तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे फार गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.ए. बी. पाटील यांनी यशस्वी महिलांचे उदाहरणे देऊन महिलांचा आदर सन्मान प्रत्येकानी करावा असे नमूद केले.कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती वाकोडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|