Header Ads Widget


शहादा नगरपालिका स्कूलच्या इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्यासंदर्भात शहर भाजपाचे अध्यक्ष जितेंद्र जमदाळे व पदाधिकारी मुख्याधिकारींशी चर्चा करतांना...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे 

 शहादा येथील म्युन्यूसिपल स्कूलची इमारत त्वरित दुरुस्त करण्यात यावी या संदर्भात शहादा नगरपालिका मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना परत दुसऱ्यांदा भाजपा शहर अध्यक्ष व जेष्ठ कार्यकर्ते जितेंद्र जमदाळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.   निवेदन देतांना जितेंद्र जमदाळे सह हितेंद्र वर्मा राजीव देसाई निकेश राजपूत महेश पाटील जॅकी शिकलीकर सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनात त्यांनी गेल्यात जानेवारी महिन्यात नगरपालिका प्रशासनाला म्युन्सिपल स्कूलचा इमारतीबाबत निवेदन देण्यात आले होते.मुख्याधिकारी दिनेश शिनारे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती.शाळेची इमारत ही जीर्ण अवस्थेत झाली आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी छताचे प्लास्टर पडले होते.सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने जीवित हानी झाली नाही.जुने बांधकाम झाल्याने इमारत केव्हाही कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.आतापर्यंत केवळ डाग-डूगी करण्यात आलेली आहे.केव्हाही मोठा अनर्थ घडू शकतो.या संदर्भात वेळोवेळी तक्रारी देखील केलेल्या आहेत मात्र नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे.जानेवारी महिन्यात निवेदन दिल्यानंतर मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी ऑडिट झाल्यानंतर इमारत दुरुस्तीचे काम केले जाईल असे आश्वासन दिले होते. आता परीक्षा संपल्यानंतर शाळेला अर्थात विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागेल.सुट्टीच्या या दोन महिन्याच्या कालावधीत नगरपालिका प्रशासनाने इमारतीची तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करावी असे निवेदनात म्हटले आहे.काही अनर्थ घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील असा देखील इशारा निवेदनात दिलेला आहे. शहादा शहरातील म्युनिसिपल स्कूल ही नगरपालिका संचलित आहे.विद्यालयाच्या कारभारावर पूर्ण नगरपालिका प्रशासनाचे नियंत्रण आहे.त्यामुळे शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करणे नगरपालिकेचे जबाबदारी असून कर्तव्य आहे.या संदर्भात उपसंचालक शिक्षण मंडळ नाशिक यांना देखील निवेदन पाठवणार आहोत-जितेंद्र जमदाळे-(शहादा शहर भाजपा अध्यक्ष.)

Post a Comment

0 Comments

|