Header Ads Widget


म्हाळसादेवी मंदिरात दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ केंद्रातर्फे साप्ताहिक आरती आयोजित...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे शहादा येथील म्हाळसा मंदिरात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे साप्ताहिक आरती आयोजित करण्यात येत आहे.

श्री स्वामी समर्थ महाराज यांचे बरेचसे अनुयायी यी मोठ्या प्रमाणामध्ये शहरात वास्तव्य असून प्रत्येकाला केंद्रात जाणे शक्य होत नाही. आणि म्हणूनच गुरुमाऊलींच्या आदेशान्वये शहादा शहरांमध्ये विविध चार ठिकाणी साप्ताहिक आरती केंद्र सुरू करावे असा आदेश देण्यात आला . या आदेशान्वये शहरातील मानस विहार , शिक्षक कॉलनी , मातोश्रीनगर संजय पावभाजीच्या मागे , दत्त मंदिर साईबाबा नगर , म्हाळसा माता मंदिर डोंगरगाव रोड शहादा केंद्र सुरू करण्यात आले म्हाळसा मंदिर परिसरात दर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता साप्ताहिक आरतीच्या आयोजन करण्यात येते. ठरलेल्या वेळेप्रमाणे परिसरातील सेवेकरी बंधू भगिनी कडून नैवेद्य आणण्यात येते. महाराजांच्या प्रतिमेला नैवेद्य अर्पण करण्यात येऊन नंतर आरती व मंत्र पुष्पांजली घेण्यात येते. या साप्ताहिक आरती महिला भगिनी व सेवेकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती देत आहे. साप्ताहिक आरती सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे. सेवेकऱ्या मार्फत रविवारी संस्कार केंद्र सुरू करण्याची देखील मागणी होत असून ते देखील लवकरच सुरू करण्यात येईल असा मानस सेवेकऱ्यांमार्फत करण्यात आला आहे. साप्ताहिक केंद्र सुरू झाल्यामुळे म्हाळसादेवी मंदिर सेवा समिती यांच्यामार्फत आयोजकांचे आभार मानण्यात आले व दर शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी या साप्ताहिक केंद्राच्या लाभ घेण्याचे आव्हान मंदिर सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे व सेवा समिती अध्यक्ष डॉक्टर संगीता कलाल यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|