Header Ads Widget


शहादा येथे निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी प्रशिक्षण वर्गात माहिती प्रशिक्षण संपन्न ...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे शहादा येथे तहसील कार्यालयातर्फे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक संदर्भात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक २९ मार्च रोजी दोन सत्रात अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या वेळी प्रांत अधिकारी सुभाष दळवी शहादा तहसीलदार दीपक गिरासे सह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसासाठी एकूण २१०० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन सत्रात म्हणजे एकूण चार सत्रात प्रशिक्षण देण्यात येत आहे. दिनांक २९ मार्च रोजी सकाळ सत्रात शेठ व्ही.के.शहा विद्यालयात तर दुपार सत्रात लोणखेडा बायपास रस्त्यावरील एस कुमार लॉन्स येथे प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र, ईव्हीएम मशीन हाताळणे बाबत सीलबंद करणे व इतर सर्व माहितीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. या व्यतिरिक्त संगणकीय प्रशिक्षण देखील देण्यात आले. २९ मार्च रोजी सायंकाळी प्रशिक्षण समारोप होईल. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली.  कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पहिल्या दिवशी चांगल्या प्रकारे माहिती जाणून घेतली. स्वतःहून अधिक माहिती घेण्याच्या प्रयत्न करीत होते. कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यांना पूर्ण माहिती मिळावी प्रशिक्षण दिले जावे हा मुख्य हेतू प्रशिक्षण वर्गाचा होता. लोकसभा निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडावी हा उद्देश असून निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे-दीपक गिरासे-तहसीलदार शहादा.

Post a Comment

0 Comments

|