Header Ads Widget


सोनामाई वरिष्ठ महिला महाविद्यालयात भारत ज्योती आशाताई प्रेमचंद जाधव शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रा.गणेश सोनवणे शहादा येथील सोनामाई वरिष्ठ महिला महाविद्यालयात भारत ज्योती आशाताई प्रेमचंद जाधव शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव होते.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहादा शहरातील सुरज फूड इंडस्ट्रीचे प्रमुख ॲड.स्मिता कुचेरिया सोनामाई महिला शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट आयुक्त वर्षा जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.पाटील उपस्थित होते.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत प्रथम वर्ष द्वितीय वर्ष व तृतीय वर्षात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थिनी व प्रत्येक विभागातील गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती धनादेश रूपात वाटप करण्यात आली. यावेळी बोलतांना वर्षा जाधव यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून मुलींना उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे.शिक्षणाच्या माध्यमातून मुलींनी स्वावलंबी व्हावे.प्रत्येक विद्यार्थिनींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळेल.शिष्यवृत्ती चा उपयोग चांगली पुस्तके खरेदी करण्यासाठी करा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.याव्यतिरिक्त ॲड.स्मिता कुचेरिया यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमासाठी गुणवंत शिष्यवृत्ती योजना समन्वयक प्रा. डॉ.अनिल साळुंखे व शिष्यवृत्ती योजनेचे संयोजक राजेश राठोड यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments

|