Header Ads Widget


भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण असून, प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत :-नितीन कुमार मुंडावरे

 






साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने स्वतः मतदान करत असतानाच इतरांना देखील मतदान करण्यासाठी प्रेरित करावे असे मत साक्री तालुक्याचे भूमिपुत्र अभिनेते,दिग्दर्शक व साक्री तालुक्याचे मतदान ब्रँड अँबेसिटर जितेंद्र बर्डे यांनी व्यक्त केले.भारत निवडणूक आयोग,युवा कार्य व खेळ मंत्रालय रा.से.यो क्षेत्रीय निर्देशनालय पुणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,निवडणूक साक्षरता मंडळ सि.गो.पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, तहसील कार्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जागृती रॅली च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन कुमार मुंडावरे, साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे,उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील,गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. मतदार जन जागृती रॅलीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणापासून बस स्टँड रोड मार्गे, सोनार गल्ली, मुख्य बाजारपेठ करीत तहसिल कार्यालयात शेवटी समारोप झाला . साक्री च्या एसटी आगाराच्या आवारातील ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले व तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आगाराच्या परिसराची स्वच्छता केली. रॅलीत ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग नोंदविला.रॅलीच्या समारोप प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी रॅलीला संबोधित करताना मतदान प्रक्रिया भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण असून, प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून नव मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडत असताना इतरांना देखील यासंदर्भात जागृत करण्याचा सल्ला दिला.प्रसंगी पिंपळनेरचे भटू कोठावदे यांनी साक्री तालुक्यातील विविध भाषांमध्ये मतदान करण्याचे आव्हान मतदारांना केले.  सदर रॅलीच्या आयोजनासाठी कबचौ उमवी ,जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ अनंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी डॉ.लहू पवार,राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा.विश्वास भामरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.डी.पी.पाटील, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप राठोड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.सुरेंद्र मगर, महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर रॅलीत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व निवडणूक साक्षरता मंडळाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

|