Header Ads Widget


राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाच दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेत उत्कृष्ट संघनायक म्हणून डॉ.ज्योती वाकोडे तर सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल साक्रीतील सि.गो.पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी सन्मानित...

 



साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाच दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेत उत्कृष्ट संघनायक म्हणून डॉ ज्योती वाकोडे तर सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागमंत्रालय,मुंबई,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना एकक तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाचे,कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालय सिडको नाशिक आणि के के वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत यांच्यावतीने 'आधुनिक शेती आणि युवक ' या विषयावर आयोजित पाच दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेत विद्या विकास मंडळाच्या सिताराम गोविंद पाटील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचा संघ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाला होता. महाविद्यालयाचे सहा स्वयंसेवक व एक संघनायक कार्यशाळेत सहभागी होते. सदर कार्यशाळेत वाद-विवाद स्पर्धेमध्ये कल्पेश पगारे याने द्वितीय क्रमांक पटकावला. नृत्य स्पर्धेत राणी माळचे, आनंदी देसाई, नीलम कुवर आणि अरुण राठोड,जयेश गवळे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. सदर राज्यस्तरीय कार्यशाळेत महाराष्ट्रातील आठ विद्यापीठातील 125 विद्यार्थी सहभागी विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कबचौ उमवी जळगाव चे कुलगुरू डॉ व्ही एल माहेश्वरी,प्र- कुलगुरू डॉ एस टी इंगळे, विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील, अध्यक्षा मंगलाताई सुरेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील,राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ अनंत पाटील, रासेयो विभागीय समन्वयक प्रा विश्वास भामरे, कार्यक्रम अधिकारी डॉ प्रदीप राठोड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा सुरेंद्र मगर तसेच सर्व प्राध्यापक रुंद व कर्मचारी बांधव यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

|