Header Ads Widget


औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथील महिला आरोग्य संवर्धन ऋतूमती अभियान उत्साहात संपन्न..

 

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने "महिला आरोग्य संवर्धन ऋतूमती अभियान" यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी व वक्ते डॉ रुचिताताई पाटील, प्रमुख वक्ते म्हणून शहादा येथील राधा क्लिनिक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सोनाली पाटील, शतायु हॉस्पिटलच्या डॉ सायली वैद्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार, प्राचार्य डॉ एम.के.पटेल, प्राचार्य डॉ पी.एल.पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून व्याख्यानाची सुरुवात झाली. यावेळी डॉ रुचिताताई पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दैनंदिन जीवनात महिलांना खूप धावपळ असते आणि त्यामुळे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होत असते परंतु महिलांनी दररोज व्यायाम, ध्यान, योगा आदी करावे तसेच योग्य आहार घेणे ही आवश्यक असते. सध्या महिलांमध्ये थायरॉइडचे प्रमाण वाढले असून महिलांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. थायरॉईडमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, त्यामुळे थायरॉईडमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती तुम्हाला असायला हवी. थायरॉईड होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ सोनाली पाटील यांनी महिला प्रजजन प्रणाली याविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कमी वयात लग्न आणि गर्भधारणेचा स्त्रियांचा आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतो. त्यामुळे गर्भपात, कमी दिवसाची प्रस्तूती, जोखमीची प्रस्तुती, कमी वजनाचे आपत्य जन्माला येणे इत्यादीबाबी घडतात. स्त्रीला अत्यंत मानसिक तणावातून जावे लागते. मासिक पाळीत महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मासिक रक्तस्रावाच्या वेळी योनीमार्गातली आम्लता कमी होते. यामुळे जंतुदोषासाठी अनुकूल परिस्थिती असते. अशा वेळी स्वच्छता महत्त्वाची असते. मुख्य मुद्दा म्हणजे स्वच्छ कपडयाची घडी वापरणे आवश्यक आहे. बाजारात मिळणारे पॅड्स महाग असतात. मासिक पाळीच्या दरम्यान अशा अनेक सवयी आहेत ज्या आपल्याला जाणूनबुजून किंवा नकळत हानी पोहोचवू शकतात. कधी कधी आपण केलेल्या चुका लक्षात येत नाहीत. मासिक पाळीच्या स्वच्छतेशी संबंधित महत्त्वाच्या सवयी म्हणजे पॅड बदलणे, मासिक पाळीचा कप, शौचालयात जाताना स्वच्छतेची काळजी, आहार आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर लक्ष देणे गरजेचे असते. त्यानंतर डॉ सायली वैद्य यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने काम करते. परंतू आजही कुटुंबात व समाजात स्त्रीचे स्थान कनिष्ठ आहे पुरुष प्रधान समाज व्यवस्था, घरकाम, मुलांचे पालनपोषण, कुटुंबातील लोकांची निगा वृद्वांची सेवा एकूण सदैव कष्ट करणे सतत कामामुळे तीला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे तिचा शारीरीक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. महिला व बालक निकोप आणि सदृढ असेल तर कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विकासाला हातभार लागतो. या अभियानासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर भाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ सुनिला पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.सुलभा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमृता पाटील तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments

|