Header Ads Widget


पूज्य साने गुरुजी महाविद्यालयातील गणित विभागातर्फे 'डेटा सायन्स' विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न.

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रा.गणेश सोनवणे


शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील गणित विभागातर्फे 'डेटा सायन्स' विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली.    

   कार्यशाळेच्या उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. के.पटेल हे उपस्थित होते.प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक गणित विभाग प्रमुख प्रा .डॉ.चंद्रशेखर सुतार यांनी केले.कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून निरमा विद्यापिठ अहमदाबाद येथील प्रा.डॉ.धीरेन पंडित व शिरपूर येथील प्रा.डॉ. पी.जी.भदाणे उपस्थित होते.त्यांनी 'डेटा सायन्स अॅण्ड अॅप्लीकेशन्स' संदभर्भात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी शिरपूर, शिंदखेडा, साक्री, जळगाव, नाशिक व शहादा येथील प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेस शिंदखेडा येथील प्रा. जितेंद्र पाटील, चाळीसगाव येथील प्रा. संदीप पाटील, साक्री येश्रील प्रा. योगेश आहेर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. एस.डी. सिंदखेडकर, प्रा.डॉ. एस. के. तायडे, प्रा.डाॅ.आर.झेड सैय्यद हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .डॉ.गजानन पाटील व एम. एससीच्या विद्यार्थिनींनी केले.संस्थेचे अध्यक्ष बापुसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ. एम.के.पटेल यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

|