Header Ads Widget


श्री. संत सेना नाभिक समाजसेवा मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न...



 

      नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा . गणेश सोनवणे  

        

                शहादा येथील रामदेव बाबा नगर मधील श्री. संत सेना नाभिक समाज भवन येथे श्री. संत सेना नाभिक समाजसेवा मंडळ व निम्स मेडिकेअर सर्जिकल अँड डेंटल हॉस्पिटल नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी श्री. संत सेना नाभिक समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक सोनवणे , कोषाध्यक्ष प्रकाश जाधव , सचिव परमेश्वर चव्हाण , संचालक अशोक जाधव , नाभिक समाज पंच मंडळाचे सदस्य रमण सोनवणे , भिला पवार सह हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिरीष परांडे , शैल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र राठोड , डॉ.जितेंद्र जाधव , डॉ. मानसी चौधरी , सहाय्यक रवींद्र तमायचेकर , निम्स मेडिकेअर सर्जिकल अँड डेंटल हॉस्पिटल नंदुरबारचा स्टाफ आदी. उपस्थित होते.

               सर्व प्रथम श्री. संत सेना महाराज , लिंबच माता यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अशोक सोनवणे यांनी, उत्तम आरोग्य ही धन संपदा असून आपल्या आरोग्याचे रक्षण व योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले.यावेळी बोलतांना प्रकाश जाधव यांनी, डॉक्टर हे देवदूत असून ते रुग्णांची सेवा करीत नवजीवन देत असतात. गरजू रुग्णांनी या शिबिराच्या माध्यमातून आपले रोग निदान करून योग्य उपचार करून घ्यावेत , असे सांगितले.या सर्व रोग निदान उपचार व आरोग्य शिबिर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली १०० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येऊन गरजु रुग्णांवर मोफत शस्रक्रिया निम्स हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. प्रास्ताविक परमेश्वर चव्हाण , सूत्रसंचालन अशोक जाधव तर आभार प्रकाश जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरधर सोनवणे , संजय सोनवणे , मधुकर कन्हैया , रवींद्र जाधव , श्री. संत सेना नाभिक समाजसेवा मंडळाचे सदस्य आदींनी अधिक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|