Header Ads Widget


नाईक महा विद्यालयातील पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाची क्षेत्रभेट..

 



 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 

        सातपुडा शिक्षण संस्थेच्या वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथील रसायनशास्त्र पदवी व पदवीत्तर विभागाने उमवी जळगाव विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट औद्योगिक क्षेत्र भेटीचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्यात असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. 

    तृतीय वर्ष विज्ञान, प्रथम व द्वितीय वर्ष एम. एस्सी. रसायनशास्त्र यातील विद्यार्थ्यांनी आयान मल्टी ट्रेड समशेरपुर या शुगर इंडस्ट्रीची औद्योगिक क्षेत्र भेटी दरम्यान अभ्यासासाठी निवड केली. या अभ्यास प्रक्रियेत उसापासून साखर बनविण्याची प्रक्रिया, त्याची पॅकेजिंग मिल हाऊस, बॉयलर हाऊस, क्लेरीफिकेशन , क्युरींग या प्रक्रियांची माहिती घेऊन निरीक्षण नोंदविले . या क्षेत्र भेटीच्या मुख्य उद्देश म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्षात रसायनशास्त्रातील विविध केमिकलच्या उत्पादन प्रक्रियेतील उपयोग विद्यार्थ्यांना अनुभवता यावा व परिपूर्ण ज्ञान मिळावे या उद्देशातून प्राचार्य डॉ. ए. एन. पाटील प्रशासकीय प्रमुख प्रा. हिमांशु जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते क्षेत्रभेटीच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. के. एल. पाटील, डॉ. आर. बी. मराठे डॉ. एच. डी खैरनार प्रा. ए .व्ही. पाटील व प्रा.सौ.एन.डी.पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|