Header Ads Widget


रिसेंट इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी' शहादा महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे 


    पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

    'रिसेंट इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या विषयावर आधारित राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरीष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या चर्चासत्राच्या आयोजनासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे निधी प्राप्त झाला. राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल अध्यक्षस्थानी होते.चर्चासत्रात सहभागी तज्ञ संशोधक यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. चर्चासत्राच्या संशोधन सादरीकरणाच्या प्रथम सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील रसायनशास्त्र विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. वैशाली एस. शिंदे यांनी आपल्या संशोधनाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. त्यात त्यांनी नैसर्गिक पॉलिमर्सचा उपयोग करून कॅन्सर सारख्या आजारांवर होणाऱ्या उपचार पद्धतीमध्ये केलेल्या संशोधनाची माहिती दिली. चर्चासत्राच्या द्वितीय सत्रात उका तारसाडिया विद्यापीठ बारडोली येथील तज्ञ संशोधक डॉ. परेश एन.पटेल यांनी गोल्ड नॅनो पार्टिकल्स उपयोग करून विविध औषधीय गुणधर्म असलेल्या पदार्थांच्या निर्मितीसाठी केल्याबद्दलचे संशोधन सादर केले. चर्चासत्राच्या दुपारच्या सत्रात सहभागी संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पोस्टर प्रेझेंटेशन द्वारे सादर केले. पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये राठोड हेमल-प्रथम, स्वप्निल ढाके- द्वितीय व राठोड स्नेहल आणि बागुल अश्विनी- तृतीय क्रमांक याप्रमाणे पारितोषिक मिळविले. 

या राष्ट्रीय चर्चासत्रात एकूण 130 संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजेंद्र पाटील यांनी तर प्रा. डॉ. जगदीश चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.चर्चासत्रासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागाच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|