Header Ads Widget


"एक पुरणपोळी आपुलकीची"संकल्प ग्रुप शहादा यांच्याकडून पुरणपोळीचे वाटप..



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 


 होळीनिमित्त संकल्प ग्रुप शहादा यांच्याकडून होळीच्या संध्येला शहरातील गोरगरीब कुटुंबीयांना पुरणपोळीचे वाटप करण्यात आले.आपण भारतीय लोकं सण, उत्सव साजरे करण्यात आघाडीवर आहोत. सगळ्या सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सगळे निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जोडले आहेत.आपले आरोग्य, जीवनशैली आणि अध्यात्म यांच्याशी त्यांची एक अतूट अशी नाळ जुळलेली आहे. होळी येते तेव्हा भोवतालचा निसर्ग आपले रूप बदलत असतो. पानगळ होऊन झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षांना बहर येतो. आंब्याच्या मोहराने भोवतालचा परिसर धुंद सुगंधी होऊन गेलेला असतो. अशातच कडक थंडी नाहीशी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते आणि अशातच फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण येतो. या पौर्णिमेलाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. आपल्या इतर अनेक सणांप्रमाणेच हा सण अमंगलातून मंगलाकडे, वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याची प्रेरणा देतो. होळीच्या दिवशी सर्व कुटुंबात गोडधोड करून होळीला नैवेद्य दाखवण्यात येतो परंतु गोरगरीब कुटुंबांकडे आर्थिक समस्या असल्याकारणाने सण साजरा होत नाही अशा कुटुंबियांची होळी गोड करण्यासाठी शहादा येथील संकल्प ग्रुप कडून "एक पुरणपोळी आपुलकीची"

Post a Comment

0 Comments

|