Header Ads Widget


शहादा शहरात अकरा हजार रुपये किमतीचा गांजा एलसीबी च्या पथकाने जप्त केला;गुन्हा दाखल करून आरोपीस अटक....



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 

 

 शहादा शहरातील जुनी पोस्ट गल्ली परिसरातील एका घरातून अकरा हजार रुपये किमतीचा गांजा एलसीबी च्या पथकाने जप्त केला असून सुनील प्रताप चौधरी या संशयीतास अटक करण्यात आली आहे ही कारवाई काल दिनांक 23 रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली

    शहादा शहरात सर्वत्र अवैध धंदे बंद असतानाही जुनी पोस्ट गल्ली परिसरातील एका घरात अवैधरित्या गांजा विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती या पथकाने चंडिका कलेक्शन समोर असलेल्या घरालगत सापळा लावला असता सुनील प्रताप चौधरी हा संशयित विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करीत असल्याचे आढळून आले पोलिसांनी त्याच्या घराच्या इमारतीमधील पहिला मजल्याच्या हॉलच्या मागे असलेल्या रूममध्ये झडती घेतली असता 706 ग्रॅम वजनाचा सुमारे 11 हजार रुपये किमतीचा कोरडा गांजा व तीन हजार रुपये किमतीचा वजन काटा व अन्य साहित्यासह १३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक भदाणे, पोलीस कर्मचारी विकास कापुरे, बबलू सोनार यांच्या पथकाने केली पोलीस शिपाई धनसुकलाल धिवरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील प्रताप चौधरी याच्या विरोधात कलम 294 अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम1985 चे कलम 8 (क)२०, २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे तपास उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|