Header Ads Widget


साक्री तालुक्यासह परीसरात यंदा रंगपंचमी सणावर दुष्काळाचे सावट; मात्र बच्चे कंपनीने लुटला आनंद...

 



साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला ‘रंगपंचमी’ हे नाव प्राप्त झाले आहे.होळी आणि धुलीवंदन आपण उत्साहात दरवर्षी साजरा करीत असतो पण या वर्षी संपूर्ण राज्यात पाऊस कमी झाल्याने व तापमानात उष्णतेचे कमाल वाढ झाल्याने राज्यभरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आतापासून सतावू लागला आहे गावा गावातील विहीर तळ गाठू लागले आहेत अशातच येणाऱ्या सणावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे अशातच बच्चे कंपनी मात्र आपला आनंद लुटताना दिसले.

या प्रसंगी विविध रंगांची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविताना दिसले. दरवर्षी गोपाळसवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. पूर्वी होळी म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होई.साक्री तालुक्यासह परीसरात आज रंग पंचमी सणाच्या दिवशी दर वर्षी प्रमाणे या वर्षी पाणी अभावी उत्साह कमी दिसला कारण पाणी जपुन वापरणे व पाण्याची हेळसांड करतांना दहा वेळा विचार करणे यामुळे रंगपंचमी सण पहिल्या सारखा साजरा होताना दिसत नसल्याचे चित्र बघावयास मिळाले मात्र त्याला बच्चे कंपनी अपवाद दिसली ना आम्हाला पाण्याचे टेन्शन ना रंगांचे टेन्शन आम्हीं तर रंगपंचमी जोरात उत्साहात साजरी करणार असा जणू त्यांनी निश्चय केल्याचे दिसून आले .

Post a Comment

0 Comments

|