Header Ads Widget


वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक धर्मेंद्र तांबोळी यांनी होळी व धुलीवंदन या निमित्त रंगीबेरंगी खडूने आपल्या हातकलेने जनजागृती पर संदेश देणारे चित्र काढले..


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारात असलेल्या फलकावर वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक धर्मेंद्र तांबोळी यांनी दिनांक २४ मार्च रोजी होळी सण व २५ मार्च रोजी धुलीवंदन या निमित्त रंगीबेरंगी खडूने आपल्या हातकलेने जनजागृती पर संदेश देणारे चित्र काढल्याने मुख्य आकर्षण ठरले आहे.कला शिक्षक धर्मेंद्र तांबोळी हे दरवर्षी प्रत्येक शैक्षणिक वर्षात वर्षभरातील विविध सण व उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती उपक्रमांच्या वेळी हाताने रंगीबेरंगी खडूने अतिशय सुंदर असे चित्र रेखाटतात. त्यांनी आत्ता पर्यंत अनेक सित्र काढली आहेत. काढलेल्या चित्रांचे कौतुक करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी शहरातील लोकप्रतिनिधींनी देखील कौतुक केले आहे.

होळी व धुलीवंदना निमित्त सुंदर आकर्षक काढलेल्या हुबेहूब रंगीबेरंगी चित्रात होळी पेटवतांना दाखवली आहे, तर धुलीवंदना निमित्त जळत्या होळीत आतंकवाद, भ्रष्टाचार ,अज्ञान अंधश्रद्धा व दुर्गुण साऱ्यांच्या नाश होऊन चांगले दिवस येवो, सर्वांची प्रगती हाेत राहो असा संदेश काढलेल्या चित्रातून देण्यात आलेला आहे. परिसरातील नागरिक, तरुण, युवक तसेच शिक्षक, प्राध्यापक येताना व जातांना प्रवेशद्वारा जवळ येऊन चित्र पाहून कौतुक करत आहेत.सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव, संस्थेचे समन्वयक संजय राजपूत व संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्राध्यापक हिमांशू जाधव यांनी कलाशिक्षक धर्मेंद्र तांबोळी यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments

|