Header Ads Widget


होळीच्या व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी...

 




नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रा.गणेश सोनवणे 

 

 होळीच्या व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात रविवार असतांना देखील दिनांक २४ मार्च रोजी विविध रंगांसह पिचकाऱ्यांनी बाजारपेठ फुललेली होती.विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.होळीच्या सणाला खूपच महत्त्व असून आदिवासी बांधव व सातपुडा पर्वत रांगेत गेल्या तीन दिवसांपूर्वीच होलीकाेत्सव सुरू झालेला आहे.आदिवासी वस्ती असलेल्या गावांमध्ये भोंगरा बाजार भरत आहे.आदिवासी बांधव होळीच्या सण साधारणता आठ दिवस साजरा करीत असतात.या दरम्यान ते वेगवेगळे नवस देखील फेडत असतात.

          शहादा बाजारपेठेत मुख्य बाजारपेठ बस स्थानक परिसर महात्मा गांधी पुतळा नगरपालिका कार्यालय परिसर चार रस्ता व मेन रोड भागात कमालीची गर्दी होती.रस्ता काढणे देखील कठीण झालेले होते.नगरपालिका कार्यालय जवळील चौकात मोठ्या प्रमाणात विविध रंग विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती.रंगीबेरंगी कपड्यांचे रुमाल रांगोळी शिवाय मुख्य रस्त्यांवर साखरेपासून बनविलेले हार-कंगन विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली होती.विशेषतः आदिवासी बांधवांनी साखरेपासून बनवलेले हर-कंगन खरेदीसाठी गर्दी केलेली होती. दिनांक २५ मार्च रोजी धुलीवंदन असल्याने सर्वत्र शहादा शहरात रंगपंचमी खेळण्यासाठी लागणारे साहित्य तसेच पिचकार्‍यांच्या विक्रीची दुकाने थाटलेली होती.तरुण युवक वर्ग खरेदी करण्यासाठी गर्दी करत होते.व्यापाऱ्यांनी लहान मोठ्या दुकानदारांनी रविवारची सुट्टी देखील असताना आपापली दुकाने उघडी ठेवली होती.ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहरात दाखल झालेले होते.

Post a Comment

0 Comments

|