Header Ads Widget


मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या आवारात यावर्षी पहिली होळी पेटवली ...

 


 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे


शहादा शहरातील गांधीनगर हाऊसिंग सोसायटी मधील गेल्या चार महिन्यांपूर्वीच अतिशय सुंदर व आकर्षक बांधकाम करण्यात आलेल्या परिसरातील नागरिकांचे अर्थात भाविकांची स्वप्न पूर्ण झालेल्या मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या आवारात यावर्षी पहिली होळी पेटवली गेल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला.पहिली होळी पेटतांना अनेक जण त्याचे साक्षीदार झालेत. गांधीनगर हाउसिंग सोसायटी व परिसरात महादेव मंदिर नव्हते.भाविकांना दर्शनासाठी व इतर पूजा साठी इतर वसाहतींमधील महादेव मंदिराच्या ठिकाणी जावे लागत होते.गांधीनगर हाउसिंग सोसायटीमध्ये महादेव मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा होती.येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुक्तेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या मार्फत शहरातील विविध दानशूर व्यक्ती नागरिक व भाविकांची मोठ्या प्रमाणात मदत व सहकार्य घेऊन भव्य असे मंदिराचे बांधकाम केले.राजस्थान व दक्षिण भारतातील कारागिरांनी मंदिराची अतिशय सुंदर रेखीव पद्धतीने बांधकाम केले आहे.महादेवाची शिवलिंग गणपती व नंदेश्वर यांच्या मुर्त्या देखील राजस्थान राज्यातून आणण्यात आल्या आहेत.गेल्या चार महिन्यापासून रोज दर्शनासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होत असते.

     पहिली होळी पेटवल्याने आनंद होता.शेकडो भाविक उपस्थित होते.विशेषता महिला भाविकांची संख्या अधिक होती.धार्मिक पूजा विधी करण्यात आली.रात्री सात वाजता होळी पेटविण्यात आली.महिला भाविकांनी होळीला नैवेद्य दाखवले.उशिरा रात्रीपर्यंत होळीच्या दर्शनासाठी भाविक व नागरिक येतच होते.मुक्तेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत चौधरी सह सर्व संचालक ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या आवारात पहिली होळी पेटली याच्या आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता.

Post a Comment

0 Comments

|