Header Ads Widget


वडाळी ता.शहादा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत;ग्रा.पं.सदस्या कल्पना मोहिते अध्यक्षपदी तर श्री.चंद्रकांत रायसिंग सर यांची उपाध्यक्ष पदावर निवड..

  




 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 

वडाळी ता.शहादा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय यादव खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थनगर वडाळी येथे संपन्न झाली बैठकीत सर्व संमतीने उत्सव समितीचा प्रस्ताव मांडण्यात आला उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान ग्रा.पं.सदस्या कल्पना मोहिते तर उपाध्यक्ष पदावर विकास इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य श्री.चंद्रकांत रायसिंग सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच सचिव पदावर श्री.तात्या बैसाणे यांची निवड करण्यात आली बैठकीला प्रविण बैसाणे, दिलीप बैसाणे,जयेश सोळंखे, अजय सोळंखे,महावीर बैसाणे हेमंत बैसाणे,अप्पा घोडसे, केदार कढरे,सुनिल मोहिते,संतोष बैसाणे, विजय साळवे आदी उपस्थित होते.

यावर्षी उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण वडाळी गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक तसेच विविध महापुरुष यांच्या विचारसरणीवर आधारित प्रबोधनात्मक भाषण,गितगायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत रायसिंग सर यांनी दिली.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कार्यकारणी 2024 -25 अध्यक्ष - कल्पनाताई वसंत मोहिते,उपाध्यक्ष - श्री.चंद्रकांत मधुकर रायसिंग,खजिनदार - श्री.तात्या जयराम बैसाणे, सह - खजिनदार सुनील सुदाम मोहिते, सचिव - श्री.प्रवीण आत्माराम बैसाणे,सह- सचिव - श्री.संजय यादव खंदारे,कोषाध्यक्ष - श्री.संतोष भीमराव बैसाणे,कार्यकारणी सदस्य -श्री.दिलीप तुकाराम सोळंके,श्री.आप्पा विक्रम घोडसे, श्री.विजय गोरख साळवे,श्री.अरविंद भीमराव बैसाणे व आदी.

Post a Comment

0 Comments

|