Header Ads Widget


शहादा महाविद्यालयात संशोधन पद्धतीवर सेमिनार आयोजन संपन्न.

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे 

  पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी, मराठी व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यामाने संशोधन पद्धतीवर सेमिनारचे आयोजन करण्यांत आले होते.    

     या सेमिनारचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम.के. पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रा. डॉ. वैभव सबनीस(डॉ. बाबासाहेब मेमोरियल लॉ कॉलेज धुळे), प्रा. अशोक गिरासे (मराठी विभाग) व प्रा. मनोज पाटील (हिंदी विभाग, कला महाविद्यालय, म्हसावद) हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस. डी. सिंदखेडकर, डॉ. रवींद्र माळी, डॉ.खुमानसिंग वळवी, हिंदी विभाग प्रमुख डॉ. गौतम कुवर, जेष्ठ प्रा. डॉ'. व्ही. ओ. शर्मा, मराठी विभाग प्रमुख डॉ. तुषार पटेल, व प्रा. दिनेश पाटील यांनी सेमिनारचे आयोजन केले होते.प्राचार्य प्रा. डॉ. एम.के. पटेल यांनी प्रस्तावनेत संशोधनाचे महत्व विशद केले व येणारे युग हे साशोधानाचे युग असून राष्ट्रीय शैक्षणिक 2020 मध्ये पदव्यूत्तर शिक्षणात संशोधनाला मुख्य स्थान आहे असे प्रतिपादन केले. पहिले व्याख्यान हे प्रा.अशोक गिरासे यांचे संपन्न झाले. त्यांनी मराठी साहित्य तसेच भाषेत संशोधनाला खूप वाव आहे, संशोधनासाठी निरीक्षण, वाचन व लेखन महत्वाचे आहे असे नमूद केले. दुसरे व्याख्यान प्रा.मनोज पाटील यांचे होते. हिंदी भाषा ही राष्ट्र भाषा आहे. त्यात भाषांतरवर मोठे संशोधन होऊ शकते. त्यांनी संशोधनातील पद्धती, संशोधनाचा आराखडा या बद्दल सविस्तर विवेचन केले. तिसरे व्याख्यान डॉ.वैभव सबनीस यांचे झाले. त्यांनी इंग्रजी, मराठी तसेच हिंदी साहित्यात संशोधन कसे करावे?, विषयाची निवड कशी करावी? गृहीतके कसे तयार करावेत? या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. वृत्तपत्राची भाषा, जाहिरातीची भाषा, कन्टेन्ट लेखन, तसेच भाषा उच्चारण या विषयांवर संशोधनाला खूप वाव आहे असे नमूद केले. कार्यक्रम आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, संस्थेच्या मानद सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मयुरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार डॉ.आर. एस.माळी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|