Header Ads Widget


आग्रीपाडा येथे शिक्षण परिषद संपन्न...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 

काकडदा (ता.धडगाव) केंद्राची शिक्षण परिषद पुष्प सातवे जिल्हा परिषद शाळा आग्रीपाडा, जिल्हा परिषद शाळा आमलीपाणी, जिल्हा परिषद शाळा कंज्यापाणी यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. शाळा आग्रीपाडा येथे संपन्न झाली. महिला शिक्षिका माधुरी बाविस्कर अध्यक्षस्थानी होत्या.

शिक्षण परिषदेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांनी पुरवलेल्या विषय पत्रिकेनुसार विषय घेण्यात आली. शिक्षण परिषदेचा मागोवा काकडदा केंद्राचे केंद्रप्रमुख उमेश कोळपकर यांनी घेतला . मूल्यमापन विषयाच्या संदर्भात अंबिका गायकवाड यांनी माहिती दिली. मतदार जागृती कार्यक्रमाबाबत कविता खैरनार यांनी सांगितले. केंद्रातील उत्कृष्ट शाळा सादरीकरण नीलिमा विभांडीक व मीनाक्षी कुवर यांनी सादरीकरण केले.या शिक्षण परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधून संपूर्ण शिक्षण परिषद काकडदा केंद्रातील सर्व महिला शिक्षिकांनी संचलित केली.महिला दिनाविषयी वैशाली राजपूत यांनी मनोगत मांडले. गुणवत्ता वाढीचा प्रवास माधुरी बाविस्कर यांनी सांगितला.शिक्षण परिषदेमध्ये दुर्गम भागात काम करणाऱ्या सर्व महिला शिक्षिकांचा,आशाताई, अंगणवाडी सेविका यांचा काकडदा केंद्रातर्फे येथे सन्मान करण्यात आला. शिक्षण परिषदेला आग्रीपाडा गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिवाल्या पटले,पोलीस पाटील किसन पटले, सामाजिक कार्यकर्ते भीमसिंग वळवी, इंदिराताई पटले, रायनीबाई पटले, उग्रावण्या कारभारी , महेंद्रसिंग राजपूत, प्रदीप राजपूत, योगेश राणे , सतीश शिंपी ,दिनेश कोळपकर उपस्थित होते. शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी संजय धनगर , भरत आखडमल, गुलाबसिंग पाडवी, लक्ष्मण पवार ,गोकुळ वाडीले,संजय वळवी ,हूरसिंग वळवी, कविता खैरनार यांनी परिश्रम घेतले. यावेळी काकडदा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन मीनाक्षी कुवर यांनी तर आभार नीलिमा विभांडिक यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|