नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे
नगर पालिका प्राथमिक शिक्षण मंडळ शहादा अंतर्गत शहरातील सर्व नगर पालिका व खाजगी प्राथमिक शाळांचे संयुक्तपणे प्रशासन अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने संत गाडगेबाबा नगर पालिका प्राथमिक शाळा क्रमांक सात येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या नियोजनानुसार दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. जागतिक महिला दिन सप्ताह निमित्ताने केंद्रातील संपूर्ण शिक्षण परिषदेचे संकलन महिला शिक्षिकां मार्फत करण्यात आले.इयत्ता पाचवी व आठवीचे मूल्यमापन, स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम ,केंद्रातील उत्कृष्ट शाळा सादरीकरण ,कर्तृत्ववान महिला सत्कार ,केंद्रातील गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती आदी विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. सुलभक सादिया मॅडम, यास्मिन मॅडम, सुषमा बाविस्कर, हसूमती चत्रे ,अश्विनी कुंवर यांनी विविध विषयांची पीपीटीच्या माहिती दिली. गट साधन केंद्राचे प्रतिनिधी विनोद चव्हाण तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक वर्षा मगरे यांनी केले.
0 Comments