Header Ads Widget


पीएसजीव्हीपी मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 'राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 'विषयावर कार्यशाळा संपन्न...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे 

शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020: थीम अॅण्ड प्रॉस्पेक्ट्स' या विषयावर प्राध्यापकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महात्मा गांधी सभागृहात करण्यात आले होते.     

या कार्यशाळेत माजी प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील हे प्रमुख मार्गदर्शक (साधन व्यक्ती) म्हणून उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. के. पटेल होते.राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे सकारात्मकतेने पहायला हवे, असे विचार डॉ .आर. एस.पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य बी.एम. गिरासे, प्राचार्य डॉ. एस.पी. पवार, उपप्राचार्य एस.डी.सिंदखेडकर आदिंची उपस्थिती होती. कार्यशाळेत धडगाव, तळोदा व शहादा तालुक्यातील महाविद्यालयातील सुमारे 200 प्राध्यापक सहभागी झाले होते. प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रा.डॉ. एम. बी. जगताप यांनी करून दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांनी नवीन शिक्षण धोरणातील विविध पैलूंचा परिचय करून दिला. प्रा.डॉ.वजीह अशहर यांनी आभार प्रदर्शन केले. आयोजन समितीत प्रा .डॉ. सी. एस. सुतार, प्रा.डॉ. जी. एस. गवई यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. मिलींद एम. पाटील यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद‌ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments

|