Header Ads Widget


जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक २३ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता होणार असल्याची माहिती...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे - उंटावद तालुका शहादा येथील जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक २३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती सूतगिरणीचे कार्यकारी संचालक आर.डी.पाटील यांनी दिली.

गेल्या दहा दिवसांपूर्वी २१ जगांसाठी निवडणूक संपन्न झाली होती.निवडणुकीत सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील यांचे लोकशाही पॅनल व शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजीत पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल यांच्या तुळशीची निवडणूक झाली होती.त्यात दीपक पाटील यांच्या लोकशाही पॅनल पूर्ण २१ जागा जिंकून सहकार क्षेत्रात आपली पकड कायम असल्याचे सिद्ध केले होते.

२३ मार्च रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक होत आहे.पुनश्च दीपक पाटील यांची चेअरमन पदी निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या संदर्भात सर्व अधिकार संचालकांनी दीपक पाटील यांना दिलेले आहेत.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, May 22. | 10:26:47 PM