Header Ads Widget


वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे - शहादा येथील वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे दिनांक.२१ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र बँकेचे शहादा शाखा अधिकारी शुभम नामदेव शहादा गटशिक्षण अधिकारी डॉ. योगेश सावळे व्यवस्थापक मनोज नाईक सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव संस्थेचे समन्वयक संजय राजपूत संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा.हिमांशू जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.प्रेमचंद जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात महाविद्यालयीन परीक्षा व्यतिरिक्त विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षा क्रीडा विभाग सह अन्य क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र व वाचनीय पुस्तके देऊन गौरव करण्यात आला.स्वर्गीय नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती बक्षिस रूपात गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आले.

यावेळी बोलतांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अधिकारी शुभम नामदेव यांनी विद्यार्थी हा सामर्थ्यवान असला पाहिजे शिवाय संघर्षतील असला पाहिजे.आपण जेवढी मेहनत कराल तेवढे आपण यशाच्या शिखरावर पोहोचाल.प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासात कार्यमग्न रहावे.संघर्ष माणसाला विनम्र बनविताे असे सांगून शुभेच्छा दिल्या.तर गटशिक्षण अधिकारी डॉ.योगेश सावळे यांनी बोलतांना शिक्षण हे पवित्र आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी त्यात यश निश्चित असते.चांगल्या गोष्टी आचरणात आणाव्यात.सातपुडा शिक्षण संस्था ही संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारी संस्था आहे.विद्यार्थ्यांसाठी तळमळ आहे.विद्यार्थ्यांचे चांगले हित महाविद्यालयात जोपासले जात आहे त्याच्या लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.

प्रा.संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिक्षण हा मानवी विकासाच्या पाया आहे.शिक्षणातून मनुष्य जीवन संस्कार संपन्न होते आजचे युग स्पर्धात्मक आहे.विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीच्या उपयोग करून घ्यावा.चांगली चिकाटी व जिद्द बाळगावी असे सांगून शुभेच्छा दिल्या तर वर्षा जाधव यांनी बोलतांना विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या वापर कमी करावा.पुस्तके वाचली पाहिजेत.पुस्तके वाचल्याने परिपूर्ण ज्ञान मिळते.चांगली विचार आचरणात आणावे.मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता शिक्षण आत्मसात करून यश मिळवावे असे सांगितले.या व्यतिरिक्त एका गुणवंत विद्यार्थिनीने देखील मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महाविद्यालयाचे अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ.अशोक पाटील यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.एच.एस.पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.आर.डी.पाटील यांनी व्यक्त केले.कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. डी.वाय.पाटील प्रा.डॉ.आर. आर.सोनवणे प्रा.डॉ. मनोज गायकवाड व प्रा.डॉक्टर बी वाय बागुल यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments

|