Header Ads Widget


श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानातील स्वीप अंतर्गत मतदार साक्षरता क्लबची स्थापना...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे : नंदुरबार येथील श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानातील स्वीप अंतर्गत मतदार साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली. राज्यघटनेने मतदारांना दिलेल्या अधिकाराचे महत्त्व व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जागृती मंचाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून २१ मार्च जागतिक कविता दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. प्रशांत बागुल लिखित 'मतदानाला चला'या स्वरचित कवितेच्या काव्यपत्रकाचे विमोचन समारंभाच आयोजन करण्यात आले होते. मतदार जनजागृती करणाऱ्या काव्य पत्रकाचे विमोचन गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या शुभहस्ते व नायब तहसीलदार राजेश अमृतकर व शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्राचार्य सुषमा शहा यांच्या अध्यक्षते खाली समारंभ संपन्न झाला. या कवितेतून लोकशाहीत मतदान करण्याचे महत्त्व अधोरेखित करून नागरिकांना मतदान करण्याची आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व घरा घरापर्यंत पोहोचवले पाहिजे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी राजेश अमृतकर व एस. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात सुषमा शाह म्हणाल्या की सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय जाणीवेतून विद्यार्थी व शिक्षकांनी समाज प्रबोधनाच्या प्रक्रियेत सक्रिय झाले पाहिजे.सदर कवितेचे सामूहिक गायन कनिष्ठ महाविद्यालयाचे नोडल अधिकारी प्रा. गणेश पाटील व मतदार साक्षरता क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश पाटील तर आभार प्रकटन प्रा. निलिमा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. नितीन देवरे, प्रा. संजीवनी भावसार,प्रा.विमलेश बागुल, प्रा. नेहा पाटील, प्रा. कमलेश अहिरे,प्रा.रवींद्र ठाकरे, प्रा. नरेंद्र गिरासे,दिनेश पाटील, राजेद्र चौधरी वंदना तवर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|