Header Ads Widget


प्रकाशा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना सन्मानपत्र, साडी व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले...





नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे


शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रकाशा जागरूक नागरिक मंच यांच्या वतीने उपसरपंच हेमलता पाटील यांच्या उपस्थितीत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक व्यावसायिक क्षेत्रातात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र, साडी व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

           यावेळी जागरूक नागरिक मंच प्रकाशाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ.सनत कुमार वाणी, किशोर चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती मंगला मोहन चौधरी, प्रा.डॉ.रत्ना चौधरी व सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आला. अनेक मान्यवरांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. विविध गटात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यात शिक्षिका गटातून छाया विजय चौधरी, विजया सुदाम पाटील, राजकीय गटातून पंचायत समिती माजी सभापती मंगला मोहन चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मला संजय ठाकरे, गावातील पहिल्या महिला सरपंच रवीमाला संजीव नाईक, अंगणवाडी गटातून करुणाबाई मुरलीधर जगदाळे, रेखा राजेंद्र वळवी, आशा वर्कर गटातून ममता महेंद्र पाटील, अनिता सुदाम मोरे, आदर्श गृहिणी गटातून मोतनबाई श्रीपत चौधरी, कल्पना कपिल प्रजापती, व्यावसायिक गटातून सुखीबाई गुलाब परदेशी, राधाबाई पंडित बोरदे, सफाई कामगार गटातून शर्मिला गोडवे, रंजनाबाई गोजरे यांचा सन्मान करण्यात आला. 

            सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचचे अध्यक्ष तुकाराम चित्ते, उपाध्यक्ष विठ्ठल मिस्तरी, मंगेश अटक, विजय पाटील, संदीप सामुद्रे, छोटू कुंभार, कोषाध्यक्ष कैलास मराठे, सचिव सचिन जोशी, अशोक परदेशी, एकनाथ भोई, संतोष सोनार, सचिन सोनार, अरुण जावारे, महेंद्र बोरदे, भरत पाटील, गणेश जाधव, विजय वाणी यांनी परिश्रम घेतले तर प्रास्ताविक तुकाराम चित्ते व सूत्रसंचालन निखिल चौधरी तर आभार महेंद्र भोई यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|