Header Ads Widget


नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातर्फे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार अँड.के सी पाडवी यांचे सुपुत्र अँड.गोवाल पाडवी यांची उमेदवारी निश्चित..

 



नंदूरबार/प्रतिनिधी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतून राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार अँड .पाडवी यांचे सुपुत्र एडवोकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्याच्या नावावर दिल्ली हाय कमांकडून शिक्कामोर्तब झाला असून. लवकरच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून लोकसभेचे उमेदवार म्हणून अँड .गोवाल पाडवी हे उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून, त्या अनुषंगाने महायुतीतर्फे विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांना भारतीय जनता पक्षातून उमेदवारी निश्चित झालेली असताना, मागील गेल्या कित्येक दिवसापासून महाविकास आघाडी मधून नेमकी लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क होते, तर मागील काळात महाविकास आघाडी मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी वरिष्ठांकडे लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी कार्यकर्त्यांतर्फे वरिष्ठांकडे इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांनी मागील काळात महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करून महाविकास आघाडीला धक्का दिला, तर महाविकास आघाडीतीलच काँग्रेस पक्षाचे राज्याचे माजी अध्यक्ष विकास मंत्री अँड .पद्माकर वळवी यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केल्याने मोठा धक्का महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाला बसल्याने, लोकसभेची उमेदवारी ही के सी पाडविंनी यावेळेस न लढण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांनी त्यांचे सुपुत्र अँड .गोवाल पाडवी यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते आहे, आता महाविकास आघाडीतर्फे अँड .गोवाल पाडवी तर महायुतीतर्फे भाजपातून डॉ. हिना गावित या लोकसभेच्या उमेदवारी करण्यास सज्ज झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, तर आगामी काळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून अजून इच्छुकांची नावे पुढे येण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

0 Comments

|