प्रतिनिधी/ शहादा
सातपुडा शिक्षण संस्थेच्या वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथील रसायनशास्त्र पदवीत्तर विभागातील प्रथम, द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक दिवस उत्साहात साजरे केले.
महाविद्यालयाच्या आठवणी या चिरकाल स्मरणात असाव्यात तसेच रोजच्या अभ्यास व प्रात्यक्षिक दिनक्रमातून थोडा विरंगुळा त्यासोबतच भारतीय परंपरा व संस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात पारंपारिक दिवस साजरे करणे हा एक अनोखा अनुभव या दिवसात आपण आपल्या देशाच्या वारसा व संस्कृतीचे प्रदर्शन करतो. याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थी आपल्या पारंपारिक पोशाखात सुंदर व अभिमानास्पद दिसतो. या विभागातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पेहराव परिधान करत डिझायनर साड्या, कुर्ते, शेरवानी, धोतर तसेच महाराष्ट्रीयन, गुजराथी ,मारवाडी, आशा नाना विविध पेहरावाने कॉलेज कॅम्पस रंगीबेरंगी करत भारतीय परंपरा व संस्कृतीच्या वारसा जोपासण्याच्या संदेश दिला. हा दिवस विद्यार्थ्यांना देशाच्या मातीशी वारसा जुळण्याची संधी देतो त्यात व्हाईट डे , ट्विन्स डे ग्रुप डे व ट्रॅडिशनल डे उत्साहात साजरे करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे आयोजन संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा हिमांशु जाधव व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ के एल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉ मराठे, प्रा डॉ खैरनार, प्रा डॉ अनिल पाटील, प्रा नक्षत्रा पाटील आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 Comments