Header Ads Widget


सोनामाई महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी साहित्य विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन...



शहादा /प्रतिनिधी


 शहादा येथील सोनामाई महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी साहित्य विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोनाबाई शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट आयुक्त वर्षा जाधव महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.एस.पाटील उपस्थित होते.प्रथम सोनामाई यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून साहित्य विचार मंथन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

       साहित्य विचार मंथन कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून त्यात त्यांनी देशातील लोकसंख्येची वाढ कविता गायन मतदान जनजागृती गांधीजींच्या सत्याग्रह सह अन्य विषयावर विचार मांडलेत.यावेळी बोलतांना प्रा. संजय जाधव यांनी विद्यार्थिनींनी मनात कोणतेही प्रकारची भीती न बाळगता वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकास होतो.प्रत्येकाने साहित्य जपले पाहिजे असे आवाहन केले तर वर्षा जाधव यांनी बोलतांना विद्यार्थिनी कार्यक्रमाच्या मुख्य केंद्रबिंदू असून कार्यक्रमात सहभाग घेतल्याने ज्ञानात अधिक भर पडते.विद्यार्थिनी ह्या कृतिशील झाल्या पाहिजेत हा कार्यक्रमाच्या उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.याव्यतिरिक्त प्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले.साहित्य विचार मंथन कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या चांगला सहभाग होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.बी.आर.राजपूत यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा. डॉ.अनिल साळुंखे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|