Header Ads Widget


बापरे! उभ्या असलेल्या वाहनाच्या वर चढत काच फोडत बैल कारमध्ये घुसला...

 




 
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी / प्रा. गणेश सोनवणे 


शहादा तालुक्यातील टुकी-जवखेडा गावालगत समोरुन जनावर येत असल्याने वाहनचालक यांनी वाहन थांबलेले असता. जनावरांच्या लोंढा मधुन एक बैल भरधाव वेगाने पळता-पळताना समोर उभी असलेल्या वाहनाच्या वर चढत काच फोडत बैल मध्ये घुसला. वाहानात पाच प्रवाशी बसलेले होते. या घटणेत दामळदा ग्रामपंचायत उपसरपंच डॉ विजय पाटील सह पाचही प्रवाशी बालंबाल बचावले आहे .म्हणतात ना " देव तारी त्यास कोण मारी" याचे प्रत्येय पाटील कुटुंबातील लोकांना आला आहे सदरची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.. 

    याबाबत मिळालेली माहिती अशी की दामळदा ग्रामपंचायतचे उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील व कुटुंब, नातेवाईक शहाद्याहून कार्यक्रम आटपून आपल्या गावाकडे निघाले असता टूकी - जवखेडा गावा लगत प्रवेश केला असता समोरून जनावरांच्या लोंढा येत असल्याचं डॉ. विजय पाटील यांचे लक्षात आलं वाहन रस्त्याचा बाजुला थांबवलं होते जनावर हळूहळू येत असताना समोरून त्याच घोळक्यातून एक बैल भर धाव वेगाने धावत येत असल्याच्या लक्षात येतात वाहन क्रमांक जे.जी एम. ५१५४ या वाहनात बसलेले पाचही प्रवाशांनी समय सुचकता लक्षात घेत तातडीने वाहनाचे दरवाजा उघडून वाहनाच्या बाहेर निघून गेलेत आणि बैलाने धडकन उडी मारून वाहनावर चढून वाहनाच्या पुढच्या काच फोडत आत प्रवेश केलेला आहे बैलाचा उजव्या भागातील दोन पायांपैकी मागच्या एक पाय हा दरवाज्याच्या बाहेरच लटकलेला होता अर्ध्यापेक्षा जास्त शरीर वाहनांमध्ये घुसल्याने बैल काढणे देखील अशक्य झालेले होते वाहनात बसलेला लोकांनी सावधानता बाळगली नसती तर वाहन चालक व त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्ती यांना जीव गमवावे लागले असते, म्हटले जाते ना देव तारीख त्यास कोण मारी दामळदा ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉ. विजय पाटील हे सातत्याने समाजासाठी गोरगरिबांसाठी सकारात्मक काम करीत असल्यामुळे त्या पुण्याईचा त्यांना फळ मिळालेले आहे ही घटना पाहताच आजूबाजूच्या रहिवाशीन गोळा झालेले होते सायंकाळी उशिरापर्यंत बैल काढण्यासाठी प्रयत्नशील सुरू करण्यात आलेली होती बैलाच्या चेहऱ्याला व नाकाजवळ काच भोसल्याने जखम झाल्याने रक्त झालेला होता बैलाच पुढच्या पूर्ण चेहरा वाहनाच्या मागच्या सीता पर्यंत येऊन पोहोचला होता ही घटना पाहतात नागरिक देखील भयभीत झालेले होते..

Post a Comment

0 Comments

|