Header Ads Widget


भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाईला तीन हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केले अटक..



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे 


  वडिलोपार्जित शेत जमिनीची पुन्हा फेर मोजणी करावयाची असल्याने मोजणी साठी अर्ज घेऊन गेलेल्या तक्रारदाराला अर्ज करू नका मला तीन हजार रुपये द्या, मी तुमच्या शेतात येऊन मोजणी करून देतो असे सांगत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायास तीन हजार रुपयाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक  विभागाने अटक केली.


 याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील भूमिअभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद बाळू शिंदे (वय ४२, रा. सावखेडा ता. शहादा )यांनी तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेत जमिनीची चार ऑक्टोंबर २०२३ ला भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आलेली होती. परंतु काही कारणास्तव तक्रारदार यांना सदरची जमिनीची पुन्हा फेर मोजणी करावयाची असल्याने फेर मोजणीच्या अर्जासह तक्रारदार भूमी अभिलेख कार्यालयात गेले तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका मी तुमची जमीन शेतात येऊन मोजणी करून देतो त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला तीन हजार रुपये देऊन द्या असे सांगून लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून १३ मार्च ला पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता शिपाई श्री शिंदे यांनी (ता.१६) मार्च ला पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर ,अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी ,पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागा नंदुरबार चे पोलीस उपअधीक्षक तथा सापळा पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी, सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक ला. प्र. विभाग नंदुरबार माधवी वाघ तसेच पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, हेमंत महाले ,सुभाष पावरा आदींनी कारवाई केली.

Post a Comment

0 Comments

|