नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे
कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सायन्स फोरमतर्फे 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन अध्यक्ष मा. प्रा. भैयासाहेब संजयजी जाधव, सचिव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ यांनी केले. प्रमुख अतिथी संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा. हिमांशु संजय जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. पाटील होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सायन्स फोरमतर्फे सायन्स क्विझ, पॉवरपॉईंट व पोस्टर प्रदर्शन आणि सादरीकरण घेण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. प्रा. संजयजी जाधव म्हणाले की विद्यार्थांनी उत्तम दर्जाचे पोस्टर व पीपीटी तयार केले, यावरून त्यांच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. विद्यार्थांनी सध्या येणाऱ्या विषयावर अभ्यासकरून त्या संदर्भातील वैज्ञानिक संकल्पना पोस्टर्स, शोधनिबंधाच्या माध्यमातून मांडायला पाहिजेत तरच यातून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्ट्या समृद्ध व्हायला मदत होईल, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष विज्ञान ते एम. एस्सी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पॉवरपॉईंट सादरीकरणात १५ व पोस्टर प्रदर्शन करीता ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पॉवरपॉईंट सादरीकरण प्रथम वर्षातून कापडणे सुश्मिता गोपाल प्रथम, सुर्यवंशी प्रभात जयदेव व सोनवणे मेघा भाऊसाहेब द्वितीय, पाडवी रुम्मल्या रंगल्या तृतीय व गिरासे नंदिनी सुरतसिंग ही उत्तेजनार्थ राहिली. द्वितीयवर्षातून जाधव काजलबेन रमेश प्रथम, पिंजारी आसिया इसाक व काद्री अर्सीन बासित द्वितीय, महाले प्रिती गणेश ही तृतीय राहिली. तृतीय वर्षातून मनियार अल्फिया गयास व सामुद्रे अश्विनी शांतीलाल प्रथम, चौधरी पुजा द्वितीय, शिरसाठ संघमित्रा कांतीलाल तृतीय व पिंजारी फिरदोष शब्बीर ही उत्तेजनार्थ राहिली. पोस्टर प्रदर्शनात प्रथमवर्षातून सुर्यवंशी प्रभात जयदेव व कापडणे सुश्मिता गोपाल प्रथम, सोनवणे मेघा भाऊसाहेब द्वितीय, पाडवी रुम्मल्या रंगल्या तृतीय तसेच गिरासे नंदिनी व आकांक्षा संदिप कुलकर्णी ही उत्तेजनार्थ राहिली. द्वितीयवर्षातून जाधव काजलबेन रमेश प्रथम, ठाकरे उत्कर्षा द्वितीय, राठोड प्रियंका राजु तृतीय तसेच चित्ते भाग्यश्री ही उत्तेजनार्थ राहिली. तृतीयवर्षातून चौधरी माधुरी प्रथम, शिंदे दिपाली द्वितीय, कोळी प्रियंका बापु तृतीय व शिरसाठ संघमित्रा कांतीलाल ही उत्तेजनार्थ राहिली. पॉवरपॉईंट व पोस्टर प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून डॉ. बी. वाय. बागुल, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. आर. बी. मराठे यांनी काम पहिले. प्रा. आर. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. पदार्थविज्ञान विषयाचे प्रमुख व सायन्स फोरमचे समन्वयक डॉ. बी. वाय. बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थितांचा परिचय करून दिला. तांत्रिक बाब डॉ. एस. एस. ईशी सरांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
0 Comments