Header Ads Widget


शहादा येथील आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे मैदानावर उद्घाटन ...



शहादा /प्रतिनिधी


 शहादा येथे वसंतराव नाईक शैक्षणिक क्रीडा संकुलात दिनांक १३ मार्च रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न होऊन मुलांच्या गटात धुळे संघ विजेता व जळगाव येथील संघ उपविजेता ठरला तर मुलींच्या संघात जळगाव संघ विजेता धुळे संघ उपविजेता ठरला.स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक डॉक्टर योगेश चौधरी व हृदयरोग तज्ञ डॉक्टर हेमंत नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव होते.तर प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील.सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव लोणखेडा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील माजी नगरसेवक डॉक्टर योगेश चौधरी डॉक्टर हेमंत नेमाडे पियू हेल्थ क्लबच्या रिता प्रदीप पटेल जायट्स फेडरेशनच्या ॲड.संगीता पाटील संस्थेचे समन्वयक संजय राजपूत संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा.हिमांशू जाधव प्राचार्य डॉ.अशोक पाटील प्राचार्य डॉ. व्ही.एस.पाटील उपस्थित होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते मैदानावर श्रीफळ फोडून आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.दरम्यान लोणखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

         यावेळी बोलतांना प्रा.संजय जाधव यांनी खेळाडूंनी मैदानी स्पर्धांमध्ये मेहनत व चिकाटीने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव लौकिक करावे.खेळ हा चांगल्या भावनेने खेळला गेला पाहिजे.मैदानी स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले.तर क्रीडा संचालक प्रा.डॉ. दिनेश पाटील यांनी बोलतांना खेळाडूंनी वातावरणाशी निगडित राहावे.सातपुडा शिक्षण संस्थेने गेल्या दोन महिन्यापूर्वी राज्य पातळीवरील खो-खो स्पर्धेचे चांगले आयोजन किल्ल्याची आठवण कायम आहे.मैदानी खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी आपले आरोग्य सुदृढ ठेवावे.प्रत्येक खेळात आपले कौशल्य दाखवावे असे सांगून शुभेच्छा दिल्या.

         या व्यतिरिक्त सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील वर्षा जाधव रीता पटेल एडवोकेट संगीता पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.डी. वाय.पाटील यांनी केले.उपस्थितांचे आभार क्रीडा संचालक प्रा.डॉ.आर.आर.सोनवणे यांनी व्यक्त केले.स्पर्धेत पंच म्हणून धुळे येथील राजेश घाेपे शुभम गवळी व अमित गवळी यांनी काम पाहिले.

         अंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात ४ व मुलींच्या गटात ४ असे एकूण आठ संघ सहभागी झाले होते.त्यात मुलांच्या गटात धुळे येथील संघाने विजेतेपद व जळगाव येथील संघाने उपविजेतेपद मिळवले.मुलींच्या गटात विजेतेपद जळगाव येथील संघाने तर उपविजेते धुळे येथील संघाने मिळविले.स्पर्धेसाठी नंदुरबार विभागातील सर्व क्रीडा संचालक चार विभागीय सचिव निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|