Header Ads Widget


शहादा नगरपालिका प्रशासन तर्फे शहरात कचरा संकलनासाठी कोड स्कॅन प्रणाली लावण्याचे काम सुरू ...



 शहादा/प्रतिनिधी


 शहादा येथील नगरपालिका प्रशासन व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ महाराष्ट्र मिशन अभियान अंतर्गत घनकचरा संकलनासाठी कोड स्कॅन प्रणाली प्रत्येकाच्या घराच्या बाहेर लावण्याचे काम शहरात सुरू करण्यात आले आहे.

          अस्वच्छता व कचऱ्यामुळे रोगराई दुर्गंधी प्रदूषणयुक्त वातावरणाची निर्मिती होणे गरजेचे आहे.प्रदूषणाच्या सर्वसामान्यांच्या आरोग्य व सामाजिक जीवनावर परिणाम होत असतो.म्हणून महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कचरा गोळा करण्यासाठी कोड स्कॅन प्रणाली कार्यान्वित केली आहे.या प्रणाली द्वारे शहरातील नागरिकांच्या प्रत्येक घरावर बाहेरच्या बाजूला स्वतंत्र स्कोड स्कॅन लावली जात आहे.घंटागाडी प्रत्येक प्रभागात कचरा गोळा करण्यासाठी आल्यावर संबंधित स्कॅन कोड करतील त्या आधारावर ही संपूर्ण माहिती नगरपालिका प्रशासन स्वच्छता विभागाकडे जाईल.

      विशेष म्हणजे नगरपालिका मार्फत कचरा साठवण्यासाठी देण्यात येणाऱ्या डस्टबिनवर विशिष्ट स्कोर स्कॅन केली जाईल.ही संपूर्ण सेवा निशुल्क राहणार आहे.या प्रणालीमुळे शहरातील स्वच्छता चांगल्या प्रमाणे होण्यास मदत मिळणार आहे.गेल्या चार दिवसापासून पूर्ण शहरात प्रत्येकाच्या घरी कोड स्कॅन लावण्याचे काम सुरू आहे.मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे प्रमुख अधिकारी गोटू तावडे यांच्या अधिपत्याखाली एकूण२० रोजंदारी कर्मचारी कोड स्कॅन लावत आहेत.शहरात पूर्ण कोड स्कॅन लावली गेल्यानंतर कार्यप्रणाली सुरू होणार आहे.

Post a Comment

0 Comments

|